जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेमाचा दिवस म्हणूनच साजरा केला जातो. आपलं प्रेम प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त करत असतो. आता पुण्यातील काही तरुणांनी जाहीरपणे व्यक्त केलेल्या प्रेमाची सर्वत्र चर्चा आहे. या तरुणांनी रस्त्यावर येऊन झाडांना मिठी मारली आणि गुलाब ठेवून आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच बोर्डसाठी मारलेल्या लोखंडी खिळ्यांच्या जोखडातून झाडांना मुक्त केलं. पर्यावरणावर असणारं प्रेम व्यक्त करत पुणेकरांनी आगळावेगळा व्हॅलेंटाईन डे साजरा केला.14th February is celebrated worldwide as Valentine's Day. Everyone expresses their love in different ways. Now the love expressed publicly by some youngsters in Pune is being talked about everywhere. These youths came to the streets and hugged trees and expressed their feelings by placing roses. Also freed the trees from the yoke of the iron nails driven into the boards. Expressing their love for the environment, the people of Pune celebrated Valentine's Day in a different way.