प्रेमाचं अमर प्रतीक म्हणून जगात ताजमहालचं नाव घेतलं जातं. शहाजहाँनने आपल्या लाडक्या पत्नीच्या म्हणजे मुमताजच्या स्मरणार्थ हे अतुलनीय स्मारक निर्माण केलं. पण एखाद्या राणीनं आपल्या पतीच्या स्मरणार्थ निर्माण केलेली पहिली भव्य समाधी चंद्रपुरात अस्तिव राखून आहे. राजा बीरशहाची समाधी म्हणून ती ओळखली जाते. अठराव्या शतकातील ही समाधी आजही अतूट प्रेमाची साक्ष देत इथं उभी आहे. व्हॅलेंटाईन डे आज सर्वत्र साजरा होत असताना आजच्या प्रेमवीरांनी या समाधीमागचं खरं मर्म समजून घेण्याची गरज आहे.