देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा या अनेकांनाच भुरळ घालत असतात. जालना जिल्ह्यातील मौजपुरी या गावांमध्ये देखील एक अनोखी परंपरा पाहायला मिळते. दरवर्षी महाशिवरात्रीला होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटी इथे महाप्रसाद म्हणून उंबरधोड्याची भाजी करण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर मंदिरातील घंटी पर्यंत पोळ्या केल्यास तो स्वयंपाक कधीही कमी पडत नाही, अशी देखील येथील नागरिकांची धारणा आहे