उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.. उद्धव ठाकरेंनी पत्रकारांसोबत केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये देशातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती मिळतीये.. शिंदे गटात आम्हाला मदत करणारे काहीजण असल्याचा खुलासाही ठाकरेंनी या अनौपचारिक गप्पांमध्ये केला. उलट ज्यांच्याकडून मदतीची जास्त अपेक्षा होती त्यांनी गद्दारी केली असंही ठाकरेंनी सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्रिपद गेल्यानंतरही काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्हाला तोच सन्मान देतात मात्र भाजप हा खुनशी वृत्तीचा पक्ष असल्याची टीका त्यांनी केली.. दुसरीकडे, मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली हे आम्हाला माहीत नसून शरद पवारांची अदानींबाबत काय भूमिका आहे हे सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं नसल्याचंही ठाकरे म्हणालेत. बांगलादेशमध्ये सध्या जी परिस्थिती निर्माण झालीये ती परिस्थिती पाहता अनेकांचे पळतीचे दोर कापण्याची गरज असल्याचं ठाकरे म्हणालेत.