Udayanraje Bhosale Meet Modi : / Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्दा तापत चालला आहे. मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी राज्यभर दौरे करत आहे. आज एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महीन्यात विशेष अधिवेशनात कायदा करण्याचे आश्वासन दिले. मात्र मनोज जरांगे २४ डिसेंबरच्या आत आरक्षण द्या, या मागणीवर ठाम आहेत.दरम्यान मराठा आरक्षणासाठी राज्यातील जनतेच्या भावना उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडल्या आहेत.