उन्हाळ्यात आपण जशी स्वतःची काळजी घेतो, स्वतःचं उन्हापासून रक्षण करतो त्याचप्रमाणे आपल्या पाळीव प्राण्यांनाही जपायला हवं. कारण त्यांची त्वचाही उन्हात भाजून निघते. अनेक शेतकरी उन्हाळ्यात आपल्या गुरांसाठी पारंपरिक बंदिस्त गोठा पद्धतीचा वापर करतात. परंतु यातून हवा तसा फायदा मिळत नाही. आता ‘मुक्तसंचार गोठा पद्धती’ ही नवी संकल्पना पुढे आली असून त्यातून जनावरांना फायदा मिळतोय, शिवाय शेतकऱ्यांसाठीसुद्धा ही संकल्पना फायदेशीर ठरतेय. ही पद्धत नेमकी काय आहे, त्यात गोठा कसा असतो आणि जनावरांना त्यातून काय फायदे मिळतात, सविस्तरपणे जाणून घेऊया.