सातारा जिल्ह्यात तारळी धरणामुळे मोहन पन्हाळकर यांना पुनर्वसित व्हावं लागलं, मात्र पुनर्वसनाचं हे संकट म्हणजे नवी संधी आहे असं मानून त्यांनी तारळी धरणातच तिलापिया माशांचं संगोपन सुरू केलं. पाहता पाहता वर्षाला लाखो रुपयांची कमाई होऊ लागल्यावर त्यांच्या पत्नीनं ए वन नावाचं हॉटेल उघडलं. या हॉटेलमधून आता त्यांची हजारोंची कमाई होतेय.