कल्याणमध्ये खडकपाडा येथील ‘ठेचा वडापाव’ हा प्रसिद्ध आहे. मागील 25 वर्षांपासून सुभाष शिंगाडे हे ठेचा वडापाव विकत आहेत. आपल्या मुलाला प्रसादला सुभाष यांनी शिकवून मोठं केलं. त्याला उच्चशिक्षण दिलं. प्रसाद शिंगाडे या तरुणाने बीएमएमची पदवी घेत जाहिरात क्षेत्र निवडले आणि मेहनतीच्या बळावर त्याने हे यश मिळवत आपल्या वडिलांच्या कष्टाचे चीज केले.