शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील परिस्थिती अतिशय तंतोतंत मांडणाऱ्या तेरवं चित्रपटाची चर्चा सध्या बघायला मिळत असून हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. शेतकऱ्यांच्या घरची व्यथा या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः चित्रपटामध्ये 90 टक्के कलाकार हे विदर्भातले आहेत. त्यामध्ये वर्धातील कलाकार आहेत. त्यामुळे वर्धेकरांचा अतिशय जवळचा विषय असलेला तेरवं चित्रपट आहे. मूळचे वर्धा येथीलच असलेले दिग्दर्शक हरीश इथापे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.