आपल्या घरामध्ये एसी असावा असं प्रत्येक मध्यमवर्गी याचं स्वप्न असतं. मात्र, महागडी एसी खरेदी करणे प्रत्येकाच्याच आवाक्यात नसते. मात्र, जालन्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी मध्यमवर्गीयांचे हे स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या विद्यार्थ्यांनी केवळ 3 हजार 500 रुपयांतच एसी तयार केला आहे. मार्केटमध्ये विक्रीसाठी येईल तेव्हा या एसीची किंमत केवळ 10 ते 12 हजार रुपये असणार आहे.