There has been a good turnout in the assembly elections in the state this year. An average voter turnout of 65.11 percent has been recorded in the state. Interestingly, the highest voting has taken place in rural Maharashtra. The least voting has happened in urban areas. Highest voting has been done in Kolhapur district. 76.25 percent voting has been done in Kolhapur district. After that, Gadchiroli district has the highest voter turnout of 73.68 percent. Mumbai city district has the lowest voter turnout at 52.07 percent. In many districts of the state, the average voter turnout was above sixty percent. This number of voting is likely to increase further. Now there is a longing that this increased percentage will benefit someone.राज्यात विधानसभा निवडणुकीत यंदा चांगलं मतदान झालंय. राज्यात सरासरी 65.11 टक्के मतदानाची नोंद झालीय. विशेष म्हणजे सर्वाधिक मतदान ग्रामीण महाराष्ट्रात झालंय. तर सर्वात कमी मतदान शहरी भागात झालंय. सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झालंय. कोल्हापूर जिल्ह्यात ७६.२५ टक्के मतदान झालंय. त्या पाठोपाठ गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ७३.६८ टक्के मतदान झालंय. सर्वात कमी मतदान मुंबई शहर जिल्ह्यात ५२.०७ टक्के झालंय. राज्याच्या अनेक जिल्ह्यात सरासरी साठ टक्केच्या वर मतदानाची नोंद झालीय. मतदानाचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता हा वाढलेला टक्का कुणाच्या फायद्याचा ठरणार याची उत्कंठा लागून राहिलीय.