Sunetra Pawar In Modi Baug : खासदार सुनेत्रा पवार मोदी बागेत, कोणाची भेट घेतली? | Marathi NewsBig events are happening behind the scenes in Maharashtra politics for the last two days. Chhagan Bhujbal, the leader of the Ajit Pawar group in the Nationalist Congress Party, went to Silver Oak in Mumbai to meet Sharad Pawar on Monday. After that, MP Sunetra Pawar has reached Sharad Pawar's Modi Bagh on Tuesday. MP Sunetra Pawar was in Modi Bagh for more than an hour.महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्व्हर ओकवर गेले होते.त्यानंतर मंगळवारी शरद पवार यांच्या मोदीबागेत खासदार सुनेत्रा पवार पोहचल्या आहेत. सुमारे तासभरापेक्षा जास्त वेळ खासदार सुनेत्रा पवार मोदी बागेत होत्या. त्यावेळी शरद पवार मोदी बागेत होते. सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेत जाऊन अजित पवारांच्या धाकट्या बहीण म्हणजेच नीता पाटील यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार आणि शरद पवार मोदी बागेत असूनही एकमेकांना भेटले नसल्याची माहिती न्यूज18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे.