उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गृहिणी वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करून ठेवत असतात. वर्षभर टिकणारे खाद्यपदार्थ तयार करण्याकडे गृहिणींचा कल असतो. आंब्याच्या कैऱ्यांपासून देखील वर्षभर टिकणारे वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले जातात. कच्ची कैरी आणि गुळापासून तयार होणारा गुळांबा अनेकांना आवडतो. अगदी कमी साहित्यात हा गुळांबा कसा तयार करायचा? याबाबत जालना येथील गृहिणी विद्या गुजर यांनी सांगितली आहे.