सध्या सर्वत्र कडाक्याचं ऊन पडतं, अशात काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा होते. बऱ्याचदा आपण ऊसाचा, लिंबाचा रस पितो. परंतु चहा, कॉफीला काही पर्याय नसतो. कोल्ड कॉफी आहे. परंतु तीसुद्धा परफेक्ट जमेल की नाही, याची काही गॅरंटी नसते. आज आपण सध्याच्या या तळपत्या उन्हात शरिराला गारवा मिळेल आणि आरोग्यही सुदृढ राहील अशी गारेगार ग्रीन आईस टी कशी बनवायची हे पाहणार आहोत. डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी या हेल्थी चहाची अगदी झटपट होईल अशी सोपी रेसिपी सांगितली आहे.