सध्या उन्हाचा तडाखा वाढतो आहे. वाढत्या उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे डिहायड्रेशन किंवा इतर हंगामी आजारांचा त्रास होऊ शकतो. आपण आपल्या रोजच्या आहारात काही असे पदार्थ खातो ज्याने आपल्या शरीरातील हिट ही आणखीन वाढते आणि सोबतच रक्तदाबाच्या समस्या उद्भवतात. याच उष्णतेवर मात करण्यासाठी आणि उन्हाळ्याशी संबंधित आरोग्य समस्या टाळण्यासाठी आपण नेमके कोणते फळे या सीझनमध्ये खायला हवीत? ज्यामुळे शरीराला उत्तम पोषण मिळण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी मदत होईल याबद्दच मुंबईतील आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी माहिती दिली आहे.