सध्याच्या वाढत्या उन्हासोबतच त्यापासून बचाव करण्यासाठी पंखा, कुलरसह एसीचा वापर देखील वाढू लागला आहे. बरेच जण तर दिवसा ऑफिसमध्ये आणि रात्री बेडरूममध्ये सतत एसीच्या वातावरणात राहत असतात. मात्र एसीचा अतिवापर हा आरोग्यावर दुष्परिणाम करणाराच असतो. विविध समस्यांना या एसीच्या अतिवापरामुळे सामोरे जावे लागते असे कोल्हापुरातील छत्रपती प्रमिनाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या डॉ. अनिता परितेकर सांगतात. डॉ. परीतेकर या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय येथील मेडीसिन विभागाच्या सहयोगी प्राध्यापक आहेत.