उन्हाळ्यात वर्षभर लागणारी पापड, लोणची बनवून ठेवली जातात. बऱ्याच गृहिणी हे घटक घरी बनवून विकण्याचा घरगुती व्यवसाय करत असतात. त्यामुळे त्यांचा वेळही जात असतो आणि घराला हातभार देखील लागत असतो. अशाच प्रकारे कोल्हापुरातील एक महिला विविध प्रकारचे पापड बनवून विकण्याचा व्यवसाय गेली कित्येक वर्षे करत आहे. त्यांच्या हातच्या पापडाला चव असल्याने कित्येक ग्राहक वर्षानुवर्षे त्यांच्याकडे पापड खरेदी करतात.