उकाडा आता इतका वाढलाय की, रस्त्यात थांबून थांबून पाणी पिण्याची वेळ येते. लिंबाचा किंवा ऊसाचा रस प्यायला तर जीव जरा थंड होतो. ऊसाच्या रसाचा ग्लास एकदा तोंडाला लावला की, अनेकजण गटागट तो रिकामा करतात. पण तुम्ही कधी एक विचार केलाय का, ऊसाच्या रसाचं जे लोखंडी मशीन असतं त्यात असणारं ग्रीस चुकून रसात मिसळलं आणि आपल्या पोटात गेलं तर आपल्या आरोग्याचे आतल्या आत काय हाल होत असतील…हाच विचार करून जालनावासियांनी एक भन्नाट आयडिया शोधून काढली. त्यामुळे जालनाकरांना आता एकदम शुद्ध नैसर्गिक ऊसाचा रस प्यायला मिळतो.