दहावीच्या परीक्षेत राज्यभरात अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तर काही जण परीक्षेत पास होण्यातच आनंद मानत आहेत. कोल्हापुरातील काही विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही दहावीचा उंबरठा चांगल्या पद्धतीने ओलांडला आहे. त्यातच कोल्हापूरची इकरा बागवान ही विद्यार्थिनी 89 टक्के मार्क मिळवत उत्तीर्ण झाली आहे. घरची परिस्थिती बेताचीच असताना अगदी क्लास न लावता फळविक्री करणाऱ्या वडिलांना आणि शिवणकाम करणाऱ्या आईला कामात मदत करत तिने हे यश संपादन केले आहे.