शिक्षणासाठी वयाचं बंधन नसतं असं आपण अनेक वेळा ऐकलं असेलच. त्याचप्रमाणे पुण्यातील श्रीमती रमाबाई रानडे हायस्कुल सेवा सदन इथे शिकणाऱ्या कमलाबाई जगताप यांनी वयाच्या 60 व्या वर्षी शिक्षण घेत दहावीच्या परीक्षेत 38.80 टक्के गुण मिळवले आहेत. त्यांनी वयाच्या 52 व्यावर्षी पहिलीच शिक्षण घायला सुरुवात केली होती. यावर्षी परीक्षा देतं नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात यश मिळवले आहे.