महाराष्ट्र बोर्डाचा 10 वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात काही मुलांनी लक्षवेधी यश मिळवलंय. यात नागपुरातील कुरिअर बॉयचा मुलगा सम्यक बेलेकर याचाही समावेश आहे. सेंटर प्रोविजनल शाळेचा विद्यार्थी असणाऱ्या सम्यकची घरची परिस्थिती बेताची आहे. आरटीईतून प्रवेश मिळाल्यानंतर त्याने खूप अभ्यास करून मोठं यश संपादित केलं. दहावीत त्याला 94.20 टक्के गुण मिळाले असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.