Various schemes are implemented on behalf of the government to get more production from agriculture at less cost. In order to reduce the sowing cost of the farmers, the seeds are also made available at discounted rates. It is necessary for farmers to get information about this from time to time. At present sowing has started everywhere. Soybean is the main crop of Satara. Administration has given subsidy for this crop. Lets know the detailed information about it.शेतीतून कमी खर्चात जास्त उत्पादन मिळावं, यासाठी शासनाच्या वतीनं विविध योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांचा पेरणी खर्च कमी व्हावा, यासाठीसुद्धा सवलती दरात बियाणं उपलब्ध करून दिली जातात. शेतकरी बांधवांनी याबाबत वेळोवेळी माहिती मिळवणं आवश्यक आहे. सध्या पेरणीची सर्वत्र लगबग सुरूये. सातारा जिल्ह्यातील शेतकरीही मोठ्या प्रमाणात पेरणीमध्ये व्यस्त आहेत. सोयाबीन हे सातारचं मुख्य पीक. या पिकासाठी प्रशासनाकडून अनुदान देण्यात आलं आहे. त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.