वाढत्या शहरीकरणामुळे अनेक शहरे प्रदूषणाच्या सावटखाली आहेत. सोलापूर शहरात देखील असंच काहीसं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. विनापरवाना वाहन चालवणे आणि कागदपत्रांची पूर्तता नसलेल्यांवर कारवाई होत आहे. तसेच कर्णकर्कश सायलेन्सर लावून रस्त्यावरून गाडी फिरवणाऱ्यांवरही कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पण या सर्वात सोलापूरच्या एका दुचाकीस्वाराच्या भूमिकेचं पोलिसांनीही कौतुक केलंय.