साप हे नाव जरी ऐकलं तरी अनेकांची भीतीने गाळण उडते. त्यात जर हा साप भला मोठा अजगर जातीचा असेल तर पाहायलाच नको. मात्र जालन्यातील बाबर पोखरी गावात निघालेल्या दोन भल्या मोठ्या अजगरांचं सर्प मित्रांनी यशस्वी सुटका केली. यामुळे या दोन्ही अजगरांना जीवदान मिळालं असून त्यांना सुरक्षित जंगलात सोडण्यात आले. अजगरांच्या भीतीतून सुटका झाल्याने गावकऱ्यांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला आहे.