आप नेते खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा हे सेलिब्रेटी कपल नेहमीच चर्चेत असतं. नुकतेच राघव यांच्या डोळ्यांवर लंडन येथे शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर राघव आणि परिणीती दाम्पत्य मायदेशी परतलं असून शुक्रवारी बाप्पांच्या दर्शनासाठी ते मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. यावेळी सिद्धिविनायकाची पूजा करून त्यांनी श्रीफळ आणि फळांचा नैवैद्य अर्पण केला.