मुख्यमंत्र्यांच्या डिप क्लिन ड्राईव्हची राज्यातील मोहिम कल्याण स्वच्छ सर्वंकष महाराष्ट्र म्हणजेच डिप क्लिन ड्राईव्ह या शिर्षकांतर्गत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक विशेष स्वच्छता मोहिम सुरु केलीये… ही मोहिम सुरुवातीला मुंबईत राबवली गेली त्याला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याने राज्यभर ही मोहिम राबवण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते… याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदार संघातून केली होती तर आता हीच स्वच्छता मोहिम पुढे सुरु ठेवून कल्याण लोकसभा मतदार संघात खासदार डॅाक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज सुरु केलिये… कल्याण पुर्वेतील १०० फुट मलंगरोड येथे ही स्वच्छता मोहिम राबवण्यात येतेये… यावेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे देखील उपस्थित होते… मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतः हातात झाडू घेवून तसच पाण्याने रस्ता आणि दुभाजक धुवून काढले