रायगडावर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. देशभरातून लाखो शिवभक्त या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला रायगडावर उपस्थित राहिले. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील 153 शिवभक्त यावेळी रायगडावर उपस्थित होते. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने त्यांच्यावरती प्रमुख जबाबदारी देखील देण्यात आली होती. ती जबाबदारी तुळजाई प्रतिष्ठानच्या शिवभक्तांनी पार पाडली.