आपल्या देशात विविध देवस्थानं अगदी दिमाखात उभी आहेत. मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटतंच, परंतु मंदिरांच्या वास्तूही एवढ्या सुरेख आहेत की त्या पाहतच राहावं असं वाटतं. धाराशिव जिल्ह्यातील माणकेश्वरचं प्राचीन शिवमंदिरही यापैकीच एक. सुंदर कलाकृतींनी परिपूर्ण असलेलं हे मंदिर वास्तूकलेचं एक उत्तम उदाहरण आहे.