महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरात साजरी केली जाते. यंदाच्या जयंतीला ‘शिवबाचं नाव’ हे गाणं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. ‘बिग हिट मीडिया’ प्रस्तुत या गाण्यात सर्वसामान्य प्रजा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मधील अतूट नातं दाखवण्यात आलंय. मराठमोळा अभिनेता विशाल निकमनं छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली आहे. निक शिंदे, रितेश कांबळे, विशाल फाले, तृप्ती राणे आणि वैष्णवी पाटील अशी तगडी इन्स्टाग्राम रिल्स स्टार्सची टीमही गण्यात दिसतेय. बिग बजेट असणाऱ्या या गाण्याबाबत सध्या सर्वत्र चर्चा आहे.