महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे पोवाडे आजवर अनेकांनी गायले. आता यात एका नव्या गाण्याची भर पडत आहे. धाडसी, शूर, पराक्रमी अशा राजांचे स्तुतीपर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. ‘बिग हिट मीडिया’ प्रस्तुत ‘शिवबाचं नाव’ हे गाणं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. सर्व सामान्य प्रजा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मधील अतूट नातं, या गाण्यातून दाखवण्यात आलंय. या गाण्यात मराठमोळा अभिनेता विशाल निकम यानं छत्रपती शिवरायांची भूमिका साकारलीये. तसेच निक शिंदे, रितेश कांबळे, विशाल फाले, तृप्ती राणे आणि वैष्णवी पाटील असे तगडे इन्सटाग्राम रील स्टार्सची टीमही या गाण्यात पाहायला मिळतेय.