हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात पुरजळ वीस गाव पाणीपुरवठा योजनेसाठी जवळपास पाच वर्षांपूर्वी सौर ऊर्जा वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला. सिद्धेश्वर धरण परिसरात एक सौर उर्जा निर्मिती यंत्रणा प्रकल्प व वगरवाडी परिसरात एक प्रकल्प तयार करण्यात आला. परंतु या सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज निर्मिती होऊन देखील या विजेचा उपयोग पाणीपुरवठ्यासाठी झाला नाही. महावितरणकडून नेट रीडिंग मीटर न बसवल्यामुळे या विजेचा उपयोग झाला नाही. परिणामी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प व जलशुद्धीकरण प्रकल्प धूळखात पडून आहे.