शेवगा हा आरोग्याचा खजिा मानला जातो. शेंगांसोबतच अगदी पानांची भाजीही आरोग्यदायी असते. प्रथिने, फायबर, कॅल्शिअम आदींचा स्त्रोत म्हणून शेवग्याचं आहारशास्त्रात महत्त्व आहे. शेवग्याच्या विविध रेसिपी बनवल्या जातात. शेवग्याच्या शेंगांचं सार किंवा सूप हे सुद्धा अत्यंत आरोग्यदायी मानलं जातं. छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी या सूपची रेसिपी सांगितली आहे.