बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मात्र हा नमो रोजगार मेळावा ऐन निवडणुकीच्या तोंडावर बारामतीमध्येच का आयोजित करण्यात आला असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाताहेत. निवडणुकीच्या तोंडावर बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा आयोजित करून सरकारकडून विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. रोजगार आणि प्रकल्पाच्या मुद्द्यावर विरोधक सरकारला धारेवर धरत असतात. राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून अनेक प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याची टीका विरोधक नेहमी सरकारवर करत असतात. अशात बारामतीमध्येच नमो रोजगार मेळावा घेऊन राज्यात कशा प्रकारे रोजगार निर्मिती होतेय हे दाखवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. खुद्द पवारांच्या उपस्थितीतच रोजगाराचं वाटप करून विरोधकांची तोंड बंद करण्याचा प्रयत्न आहे.