पर्यावरणाचे संस्कार आपल्यात लहानपणापासून रुजलेले असावेत आणि आपण धरणी मातेचे ऋणी आहोत, या भावनेतून पुण्यातील एक बीजकन्या पर्यावरण संवर्धनाचं काम करतेय. पिंपरी-चिंचवड येथील वैष्णवी पाटील गेली 16 वर्षे पर्यावरण संरक्षणासाठी काम करत आहे. प्रामुख्याने देशी झाडांच्या बियांचे संकलन करण्याबरोबरच त्या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना आणि गरजूंना विविध प्रकारे मदतीचा हात देत आहेत. या कार्यातूनच पुढे त्यांनी ‘आरंभ फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना केली.