आजकाल जवळपास सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात. असे फार कमी पालक पाहायला मिळतात ज्यांना वाटतं की, आपल्या मुलांनी मातृभाषेत शिकावं, मराठी माध्यमाच्या शाळा सुरू राहाव्या, त्यामुळे ते आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिकवतात. परंतु बहुतांशी अव्वाच्या सव्वा फी भरावी लागत असली तरी खासगी शाळांमध्ये उत्तम दर्जाचं शिक्षण दिलं जातं, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगलं शिकवत नाहीत ही ओरड वर्षानुवर्षे ऐकू येते. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट आता अगदीच खालावल्याचं पाहायला मिळतं. परंतु याच शाळांमधून शिकून अनेक डॉक्टर, वकील, कलेक्टर पुढे येतात हेही खरंय. त्यामुळे याबाबतीत सोलापूरकरांना खरोखर मानलं पाहिजे.