ऐतिहासिक जिल्हा म्हणून साताऱ्याची ओळख आहे, या जिल्ह्यात अनेक पुरातन मंदिरं आहेत. 7व्या शतकापासून 19व्या शतकापर्यंतच्या सर्व मंदिरांची नोंद पुरातनात आढळते, असं म्हणतात. हजारो वर्षांपूर्वीची अतिप्राचीन मंदिरंदेखील साताऱ्यातील अनेक भागांमध्ये वसली आहेत. असंच एक अद्भुत आणि पुरातन मंदिर सातारा जिल्ह्याच्या परळी खोऱ्यातील बनगर गावात आहे. गावकरी सांगतात की, हे पांडवकालीन मंदिर असून असं मंदिर महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतभरात कुठंही पाहायला मिळत नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे 2 दिशांना मुख करून बसलेला या मंदिरातील एकाच शिळेवरचा मारुतीराया.