प्रत्येक माणसाला आगळीवेगळी आवड असते. कोणाला खाण्याची, कोणाला झोपण्याची, कोणाला चांगला पोशाख परिधान करण्याची तर कोणाला आगळी वेगळी चप्पल परिधान करण्याची आवड असते. सातारा जिल्ह्यातील केराप्पा कोकरे यांना अशीच आवड असून ते तब्बल 8 किलोची नागीण चप्पल पायात घालत आहेत. त्यामुळे त्यांच्या एका वेगळ्याच छंदामुळे जिल्हाभर आणि संपूर्ण महाराष्ट्राभर त्यांची सध्या चर्चा होते.