Sangli Crime Case : सांगली शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचारएकीकडे बालिकांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकाराने राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच, आता राज्यातील इतर अनेक भागातून सातत्याने अशाच घटना पुढे येऊ लागल्या आहेत. आता सांगलीतून संतापजनक घटना समोर आलीये. अल्पवयीन मुलीवर एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने शारीरीक अत्याचार केल्याची घटना समोर आलीय. धक्कादायक बाब म्हणजे यातील आरोपी हा पॅरोल रजेवर जेलमधून बाहेर होता. यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर या 35 वर्षीय रेकॉर्डवरील गुन्हेगाराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत संशयित आरोपीस आटपाडी येथून ताब्यात घेतले आहे.