NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Sambhaji Nagar News : छ.संभाजीनगरातील 50 तरुणांचा इसिसच्या जाळ्यात, NIA कडून दोषारोपपत्र दाखल

Sambhaji Nagar News : छ.संभाजीनगरातील 50 तरुणांचा इसिसच्या जाळ्यात, NIA कडून दोषारोपपत्र दाखल

Sambhaji Nagar News : छ.संभाजीनगरातील 50 तरुणांचा इसिसच्या जाळ्यात, NIA कडून दोषारोपपत्र दाखलधार्मिक कट्टरतेच्या नावाखाली दहशतवाद पसरवणाऱ्या इसिस या संघटनेच्या संपर्कात छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक तरुण असल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासात समोर आलीय. सोशल मीडियाच्या माध्यमातून संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या जाळ्यात अडकल्याची माहिती मिळतेय. फेब्रुवारी महिन्यात एनआयएनं छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल बेरीबाग इथल्या 35 वर्षीय आयटी इंजिनियर मोहम्मद जोएब खान याला अटक केली होती. मोहम्मद जोएब खान स्लीपर सेल म्हणून इसिसचं जाळं छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरवण्याचं काम करत होता. त्याच्याकडून देशातील संवेदनशील ठिकाणी हल्ला करण्यासाठी तरुणांची मोठी टोळी तयार करण्यात आली होती. भारतामध्ये मोठा घातपात करून अफगाणिस्तान किंवा तूर्की इथं पळून जाण्याचा त्यांचा प्लान होता. त्याच्या विरोधात मुंबई एनआयएच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. यातून छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरलेल्या इसिसच्या जाळ्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आलीय. यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये एकच खळबळ उडाली आहे.