काहीच दिवसांपूर्वी कोल्हापुरातील कासारी नदीच्या खोऱ्यात काही मासेमारांना एक विदेशी प्रजातीचा मासा सापडला. दिसायला काहीसा वेगळा असल्याने त्यांनी तो घराजवळील टाकीच्या पाण्यात सोडला. माहिती घेतल्यानंतर त्यांना हा मासा म्हणजे सकर मासा असल्याचे लक्षात आले. आता हा सकर मासा म्हणजे नेमका कोणता? हा विदेशी जातीचा मासा नेमका नदीच्या पात्रात कुठून आला असावा, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. याच सगळ्या प्रश्नांबद्दल अधिकची माहिती कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या जाणकार प्राध्यापकांनी दिली आहे.