अनेक तरुण आपल्या कल्पकतेने आणि बुद्धी चातुर्याने वेगवेगळे प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग जालना जिल्ह्यातील दूधपुरी गावच्या राजेंद्र पाचफुले या तरुणाने केला. मागील काही वर्षात रस्ते अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. हीच बाब लक्षात घेऊन त्याने अपघात अलर्ट सिस्टीम तयार केली आहे. या यंत्राच्या साह्याने अपघात झाल्यानंतर ताबडतोब लाईव्ह लोकेशन आणि एसएमएस नातेवाईक, पोलीस यंत्रणा आणि ॲम्बुलन्स यंत्रणेला पाठवण्यात येतो.