एखादा अपघात पाहिल्यानंतर तो बघणाऱ्याच्या मनात भीती निर्माण होत असते. मात्र त्या अपघातानंतरचा काही काळ हा गोल्डन अवर म्हणून ओळखला जातो. हा गोल्डन अवर नेमका कोणता असतो, त्याचबरोबर त्या गोल्डन अवरमध्ये नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? याबाबत कोल्हापुरातील डॉ. मधुर जोशी यांनी माहिती दिली आहे. डॉ. जोशी हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय येथील शस्त्रक्रिया विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.