मराठी मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’च्या पुढच्या सिझनची घोषणा झाली आहे. अवघ्या काही दिवसातच नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’ च्या या नव्या सीझनमध्ये आता काय नवं पाहायला मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. आता शोच्या नव्या सीझनच्या होस्टचं नाव ऐकूनच चाहत्यांना पुढच्या सीझनची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. यंदाचा सिझन बॉलिवूड आणि मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख होस्ट करणार आहे. आता रितेशने या सीझनमध्ये होस्ट म्हणून काम करताना काय अनुभव आहे, त्यासाठी तो कशी तयारी करत आहे यावर मौन सोडलं आहे.