वर्ध्याच्या जेबी सायन्स कॉलेज येथे विद्यार्थ्यांनी एक रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप तयार केला आहे. महाविद्यालयाच्या अस्ट्रोक्लबच्या माध्यमातून काही वर्ष आधी जुन्या विद्यार्थ्यांनी एक रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप तयार केला होता. त्यातून बऱ्याच गोष्टी शिकून घेऊन नव्या विद्यार्थ्यांनी ही नवी किमया करून दाखवली आहे. जास्तीत जास्त वेस्ट वस्तू वापरून कमीत कमी खर्चात हा बेस्ट रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप तयार झालाय. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना आकाशाचं दर्शन आणखी सुखाचे आणि सुस्पष्ट होणार आहे.