नेता म्हटलं की, एक साधं व्यक्तिमत्त्व समोर येतं किंवा गळ्यात जाडजूड सोन्याची चैन, बोटात 3-4 अंगठ्या, खादीचे कडक इस्त्रीचे पांढरे शुभ्र कपडे, एक मोठी चारचाकी गाडी आणि अवतीभोवती कार्यकर्त्यांचा गराडा असं व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभं राहतं. महिला कार्यकर्ती असली तरी तिचाही वेगळाच थाट पाहायला मिळतो. परंतु वर्ध्यातील एक नगरसेवक दाम्पत्य मात्र या सगळ्याला अपवाद आहेत.