रव्याचे लाडू अनेकांना खायला आवडतात. आता पर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे रव्याचे लाडू खाल्ले असतील. मात्र, कधी रवा न भाजता, तुपाशिवाय आणि पाका शिवाय लाडू खाल्ले आहेत का? हे लाडू इतर लाडू पेक्षा झटपट तयार होतात आणि कोणीही सहज बनवू शकतं. रव्याचे नव्या पद्धतीचे लाडू कसे बनवायचे? याचीच माहिती वर्धा येथील गृहिणी समीक्षा चव्हाण यांनी दिली आहे.