ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर वरळीतील माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रतन टाटा यांच्या निधानानंतर राज्यात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा यांचे अधिकृत निवासस्थान कुलाब्यातील सॉमरसेट हाऊस इथं आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांचं पार्थिव निवासस्थानी आणण्यात आलं आहे.