संपूर्ण विदर्भात नागपूरच्या राम जन्मोत्सव सोहळ्याचे आकर्षण असते. दरवर्षी राम नवमीला नागपुरातील श्री पोद्दारेश्वर मंदिरात मोठा उत्सव असतो. सध्या 17 एप्रिलच्या राम जन्मोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. श्री पोद्दारेश्वर राम मंदिर आकर्षक आणि रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात आले आहे. यंदा राम दरबार, हनुमानाचं विशाल रूप आणि इतर अनेक गोष्टी राम जन्मोत्सव मिरवणुकीचे खास आकर्षण असणार आहे.