खासदार नरशे म्हस्के यांच्यासह ठाण्यातील 22 लोकसभा उमेदवारांना हायकोर्टाची नोटीस- नरेश म्हस्केंची खासदारकी रद्द करण्यासाठी ठाकरे गटाचे राजन विचारे हायकोर्टात- नरेश म्हस्के यांना एका प्रकरणात दोषी ठरवलेलं असतानाही निवडणूक लढवल्याबाबत आक्षेप- म्हस्केंच्या प्रतिज्ञापत्रात मात्र दोषी ठरवलेलं नसल्याचा उल्लेख खोटा आणि निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा याचिकेतून आरोप- न्यायमूर्ती रियाझ छागला यांनी सर्व प्रतिवाद्यांना नोटीस जारी करत याचिकेवरील सुनावणी 2 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली- शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंनी ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारेंचा 2 लाख मतांनी केलाय पराभव