पुणे शहरात अनेक पेशवेकालीन वास्तू तसेच मंदिर आहेत. त्यापैकीच एक हरीहरेश्वर मंदिर आहे. पुण्यातील शनिवार पेठ इथे असलेलं 500 ते 600 वर्ष जुनं असं हे पेशवेपूर्वकालीन मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. पूर्वी ज्यांना कोकणात हरिहरेश्वराच्या दर्शनाला जाणे शक्य व्हायचे नाही, ती लोक इथे या मंदिरात दर्शनाला येतं. या मंदिराचा इतिहास काय आहे याबद्दलचं आपल्याला हरीहरेश्वर मंदिराचे पुजारी दत्तात्रय वाघमारे यांनी माहिती दिली आहे.